मुंबई

जिल्हा रुग्णालयात मोफत जेवणाची सोय

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांचे हक्काचे रुग्णालय म्हणून ओळखले जात आहे. या रुग्णालयात येणारे रुग्ण केवळ ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून रुग्ण येतात. या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकदेखील असतात. या रुग्णांच्या नातेवाइकांची जेवणाची चांगलीच तारांबळ उडते, अनेकवेळा रस्त्यावर वडापाव, चहा, बिस्कीट खाण्याची वेळ येते; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी दुपारी आणि रात्रीच्या सत्रात मोफत जेवणाची सोय केली आहे. एकाचवेळी साडेतीनशे व्यक्ती सकस जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

ठाणे जिल्हा रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्यात येत असून रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचे वागळे इस्टेट येथे तात्पुरते स्थलांतर केले आहे. या प्रक्रियेत रुग्णांची आबाळ होणार नाही, याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. यात ठाणे, पालघर जिल्ह्याच्या शहरी ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी पाड्यातील रुग्णांची संख्या अधिक असते. काहीवेळा रुग्ण ॲडमिट झाल्यावर त्याच्या नातेवाइकांना रुग्णालयातच थांबावे लागते; मात्र जेवणाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार अणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत जेवणाची सोय केली आहे.

अक्षय चैतन्य आणि समतोल फाऊंडेशनची मदत
रुग्णांना चांगले उपचार देताना सामान्य रुग्णालयात रुग्णासोबत येणाऱ्या व्यक्तींची जेवणाची उत्तम व्यवस्था केली आहे. काहीवेळा रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाईक, मित्रमंडळी तलासरी, भिवंडी, जव्हार, शहापूर, वाडा, मोखाडा, मुरबाड, डहाणू आदी भागातील असतात. काहीवेळा त्यांना वडापाव, चहा-बिस्कीट खाऊन राहावे लागते; परंतु असे खाणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाइकांना पोषक जेवण देण्याचा उपक्रम सुरू आहे. अक्षय चैतन्य आणि समतोल फाऊंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जेवण उपलब्ध केले आहे. दुपारी आणि रात्रीच्या जेवणात वरण, भात, भाजी आदी प्रकार असून, एकाच सत्रात ३५० व्यक्ती जेवणाचा लाभ घेताना दिसतात.


आमचा रुग्ण गेल्या पाच दिवसांपासून ॲडमिट आहे. त्यामुळे आमच्यासाठी रुग्णालयात मिळणारे जेवण मोठा आधार ठरत आहे. दोन्ही वेळा मिळणाऱ्या जेवणामुळे आम्ही समाधानी आहोत.
- सीताराम पाटील (मुरबाड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT