मुंबई

अखेर पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बंडाला यश

CD

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. २ : पालघर लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू होती. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राजेंद्र गावित यांची उमेदवारी एक महिना अगोदरच जाहीर केली होती. त्यादृष्टीने गावित यांनी प्रचारही सुरू केला. मात्र, या निर्णयाला भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी उघड विरोध केला होता. तसेच जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, तसेच तालुकाध्यक्षांनी ही जागा भाजपला मिळावी, तसेच निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, असा बंडाचा पवित्रा घेतला होता. अखेर भाजपच्या वरिष्ठांना त्याची दखल घ्यावी लागली आणि शिवसेनेवर पालघरची जागा सोडवण्याची नामुष्की ओढवली. आता ही जागा भाजपला मिळाली. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बंडाला यश आल्याची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

भाजप आणि शिवसेनेच्या २५ वर्षांच्या युतीत पूर्वीचा डहाणू आणि आताची पालघर लोकसभेची जागा भाजपकडे राहिली आहे. याला अपवाद ठरली ती २०१९ ची निवडणूक. त्यावेळी भाजपने राजेंद्र गावित यांच्यासह ही जागा शिवसेनेला बहाल केली होती. यावेळी ती पुन्हा आपल्याकडेच राहावी, म्हणून शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी हट्ट धरला होता. तसेच राजेंद्र गावितांची उमेदवारीदेखील महिनाभरापूर्वीच खासदार शिंदे यांनी जाहीर केली होती. त्यादृष्टीने गावितांनी प्रचारालाही सुरुवात केली होती.

दरम्यानच्या काळात भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला उघड विरोध करत माध्यमांकडे प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यानंतर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि तालुकाध्यक्षांनी बैठक घेत ही जागा भाजपलाच मिळावी आणि निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची मागणी केली. तसेच गावितांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करत राजीनामास्त्र देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महायुतीत वरिष्ठ पातळीवर मोठ्या घडामोडी आणि तडजोडी झाल्या. त्यानंतर पालघरची जागा भाजपला मिळाल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जाहीर करावे लागले.

उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान
जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपचा एकही प्रतिनिधी नाही. आता लोकसभेची जागा मिळवली खरी; परंतु येथील उमेदवार निवडून आणण्याचे मोठे आव्हान भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपुढे आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात पक्षाची बांधणी केली आहे. आता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना एक दिलाने काम करून पालघरमध्ये विजय संपादन करावा लागणार आहे. त्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याची जबाबदारी वरिष्ठांना घ्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT