मुंबई

वाढवणबाबत ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका

CD

पालघर, ता. २ (बातमीदार) : मच्छीमार समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या प्रस्तावित वाढवण बंदराबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाची भूमिका ही दुटप्पी व लोकांना फसवणारी आहे, असा आरोप आमदार राजेश पाटील यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना त्यांनी वाढवण बंदरासाठी १६ हजार कोटी रुपये आणल्याचे सांगितले होते, मात्र राज्यातील मविआ सरकार गडगडल्यावर आज हेच लोक आम्ही वाढवण बंदर होऊ देणार नाही, असे सांगत आहेत. त्यांची ही भूमिका दुटप्पी आणि मच्छीमार समाजाला फसवणारी आहे. वाढवण बंदर होऊ देणार नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीची आधीही होती. आजही आहे आणि उद्याही तीच राहील, असेही पाटील यांनी सांगितले.

वाढवण बंदर घोषित झाल्याच्या दिवसापासून पक्षाचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी त्याला कायमस्वरूपी विरोध केला आहे. आम्हीही विधानसभेत वेळोवेळी वाढवण बंदराचा विषय चर्चेला आणला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून निषेधाचे फलक झळकावले. मच्छीमार समाजासाठी वाढवण बंदर नको, ही भूमिका आम्ही कायम ठेवली आहे. हा प्रकल्प पालघर जिल्ह्यासाठी आणि मच्छीमारांसाठी विनाशाचा प्रकल्प आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT