मुंबई

लेटलतीफ नेत्यांमुळे कार्यकर्त्यांना उन्हाच्या झळा

CD

लेटलतीफ नेत्यांमुळे कार्यकर्त्यांना उन्हाच्या झळा
नवी मुंबईतील रॅलीला राजन विचारे तीन तास उशिराने पोहोचले
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याकरिता प्रचार, जागर रॅली, कॉर्नर सभा सुरू आहेत. मात्र, नेत्यांच्या लेटलतीफचा फटका सर्वसामान्‍य पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना बसत आहे. नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीला पक्षाचे उमेदवार राजन विचारे जवळपास तीन तास उशिरा आल्यामुळे भर उन्हात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताटकळत बसावे लागले.
ठाकरे गटातर्फे नवी मुंबईत ठिकठिकाणी महाआघाडीच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. प्रत्येक विभागातून महाविकास आघाडीचा प्रचार रथ फिरवला जात आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात आज प्रचार रॅलीकरिता राजन विचारे यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सकाळपासून नवी मुंबईतील एकता सोसायटीबाहेर उपस्थिती लावली होती. सकाळी उन्हाचा त्रास कमी होत असल्याने रॅलीला सुरुवात करण्याच्या हेतूने कार्यकर्ते सोसायटीबाहेर जमा झाले होते; परंतु अगदी १२ वाजले तरीसुद्धा राजन विचारे यांचा पत्ता नव्हता. उभे राहून पाय दुखायला लागल्याने अखेर नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चक्क रस्त्यावरच बसले. त्यांच्यासोबत असलेल्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या सावलीचा आधार घेतला. अखेर १२ वाजल्यानंतर विचारे आल्यावर प्रचार रॅली सुरू झाली. तोपर्यंत बरेचसे कार्यकर्ते व पदाधिकारी उन्हामुळे वैतागून घरी गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT