मुंबई

गोवंडीच्या आदर्शनगर मार्गाचे काम रखडले!

CD

गोवंडीच्या आदर्शनगर
मार्गाचे काम रखडले
चेंबूर, ता. २ (बातमीदार) ः गोवंडीतील आदर्शनगर परिसरातील मुख्य मार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. या मार्गावरून चालताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गाचे काँक्रिटीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आदर्श नगर परिसरातील मुख्य मार्गावर पालिका एम पूर्व ठेकेदाराकडून मलनिस्सारण पाईपलाईन टाकण्याचे काम मेसर्स फोर्स कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आले होते. मार्च २०२३ रोजी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात येणार होते. मात्र, आजही हे काम अपूर्ण आहे. स्थानिक नागरिकांनी पालिका एम पूर्व विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची अनेकदा भेट घेतली. तसेच पत्रव्यवहार केला होता. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. मार्ग क्र. १० ते १५ ला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर शाळा व मार्केट असल्‍याने सतत रहदारी असते. काम अपूर्ण असल्‍याने अनेक नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागले आहे. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: अजिंक्य रहाणेच्या मेहनतीवर सहकाऱ्यांनी फिरवले पाणी; लखनौला दिली पुनरागमनाची संधी, कोलकातात मोठा ड्रामा

Deglur NCP leadership change: देगलूर राष्ट्रवादीत खांदेपालट; शिवाजीराव कनकंटे तालुकाध्यक्ष, मंगल आलुरकर व नारायण पाटील यांना जिल्हा उपाध्यक्षपदाची बढती

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

SCROLL FOR NEXT