मुंबई

राज्यातील निम्म्याहून अधिक ट्रक रस्त्यावरच

CD

ऊन, मतदानामुळे चालकांची कमतरता; वाहनांचीही प्रचंड भाडेवाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : सध्या वाढलेल्या तीव्र उन्हाच्या झळा आणि त्यामुळे होणारी अंगाची लाहीलाही यामुळे ट्रकचालकांनी आता गावची वाट धरली आहे. त्यामुळे राज्यात निम्म्याहून अधिक ट्रक उभे आहेत.

ऑल इंडिया ट्रान्सपोर्टस् वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस अभिषेक अबू गुप्ता म्हणाले की, आम्ही सर्व श्रेणी आणि क्षेत्रांमध्ये ट्रकची कमतरता पाहत आहोत. आता चालक लग्न आणि मतदानासाठी आपापल्या गावी जात आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येने वाहने उभी आहेत. त्यामुळे ट्रकमालकांना आता ड्रायव्हरची कमतरता ही चिंतेची बाब झाली आहे.

महामार्गांवर विश्रांती घेण्यासाठी योग्य जागा नाही, स्वच्छता, भोजन आणि पार्किंगसाठी कमी जागा, तसेच पायाभूत सुविधांचाही अभाव असल्यामुळे ट्रकचालकांना त्यांच्या जीवाची नेहमीच भीती असते. सध्याच्या सरकारने येत्या काही वर्षांत १००० ट्रक स्टॉपचे नियोजन केले आहे, मात्र ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम आता ट्रकच्या भाडेवाढीमध्ये झाला आहे. या समस्यांमुळे भविष्यात आणखी जास्त वाहने रस्त्यावर उभे राहण्याची शक्यता अबू गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.
---
लग्नसराई संपत आली आहे; परंतु उन्हामुळे मोठ्या प्रमाणत चालक गावी जात आहेत. चालक नसल्यामुळे राज्यात निम्म्याहून अधिक वाहने उभी आहेत.
- राजेंद्र वनवे, अध्यक्ष, जय भगवान ट्रान्स्पोर्ट असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV New Rules : सरकारची करडी नजर तुमच्या टीव्हीवर! मोफत टीव्ही पाहणे पडेल महागात? TRAIचे नवीन नियम जाणून घ्या

इराणमध्ये घुसून अमेरिकेच्या SEALने पायलटला सुखरुप परत आणलं; भारताकडेही आहे MARCOS, पाकिस्तानला कळणारही नाही की...

Pakistan Petrol Rate : पेट्रोल दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये जनतेचा संताप उसळला; एक लीटरची किंमत ऐकून धक्का बसेल

Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पीएनजी कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था; बजाजनगरमध्ये उखडलेले रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिक त्रस्त

SCROLL FOR NEXT