मुंबई

बेलापूर न्यायालयाच्या शौचाल्याची दूरवस्‍था

CD

बेलापूर न्यायालयाच्या शौचालयाची दुरवस्‍था
न्यायालयीन कर्मचाऱ्यांसह नागरिक त्रस्‍त
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : बेलापूर न्यायालयातील शौचालयाची अवस्‍था दयनीय झाली आहे. त्‍यामुळे न्‍यायालयीन कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. वकीलवर्गाकडूनही नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे.
बेलापूर सेक्टर १५ येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्‍या इमारतीमध्ये दररोज सुमारे पाचशेहून अधिक प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. ज्यामध्ये न्यायालयातील कर्मचारी वर्ग, न्यायाधीश, वकील, पोलिस अधिकारी आदींचा समावेश आहे. मात्र, न्यायालय इमारतीमधील स्वच्छतागृहाची अवस्‍था दयनीय झाल्‍याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ‍स्‍वच्‍छतागृहाची दुर्गंधी अगदी बाहेर येत असल्‍याने नाकावर रुमाल ठेवून परिसरात वावरावे लागत आहे. याठिकाणी येणाऱ्या दुर्गंधीमुळे आजारी पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्वच्छतागृहाची अवस्था पाहता कित्येक महिने स्वच्छता न केल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना नाईलाजास्तव स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतोय. येथील भांडी तुटलेली असून पाणी नसल्‍याने रोष व्‍यक्‍त करण्यात येत आहे. त्‍यामुळे किमान स्‍वच्‍छतागृहाची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
..............................
कोट
न्यायालय प्रशासनाकडून नगरिकांच्या मागणीची दखल घेऊन स्वच्छतागृहाची स्वच्छता करावी, जेणेकरून नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होणार नाही.
-मनोज शिंदे, नागरिक
...........
कोट
न्यायालयात दिवसभर अनेक नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यात काही आरोपी अतिशय गलिच्छ असतात. तसेच स्वच्छतागृहातील दुर्गंधी बाहेरपर्यंत येते. इतकी अस्वच्छता असल्याने रोगराईदेखील पसरू शकते.
- ॲड. सुशांत जोशी

सत्यवानकडे फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT