मुंबई

संस्था, संघटनांचा लोकशाही उत्सवात सहभाग

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध गृहनिर्माण सोसायट्या, विकासक, व्यावसायिका, औषध विक्रेते यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर जिल्हा प्रशासन, स्वीप अधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत परिसरातील नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक संघटनांनी मतदानाचा टक्का वाढीसाठी ग्राहकांना सवलती देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत विविध संस्था, संघटनांनी पुढाकार घेण्याचे आश्वस्त केले.
मतदान जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या बैठकीला स्वीपचे नोडल अधिकारी तथा सहसंचालक अमोल खंडारे, तहसीलदार अस्मिता मोहिते, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण समितीचे नोडल अधिकारी मनोज शिवाजी सानप, नायब तहसीलदार स्मितल यादव उपस्थित होते. लोकशाही प्रक्रियेत सक्रिय नागरिकांचे महत्त्व असून, नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. मतदानाचा दिवस जवळ आला आहे. त्यामुळे १२ ते १८ मे या कालावधीत मतदान जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे. मतदानापूर्वी सुट्टी आल्यामुळे नागरिक बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संस्था, संघटनांनी मोठ्या प्रमाणात जनजागृतीवर भर द्यावा. तसेच मतदारांना आकर्षिक करण्यासाठी आपल्या दुकान, संघटनेमार्फत काही सवलती देता येतील का यावर विचार करावा, असे आवाहन यावेळी खंडारे यांनी केले. त्यावर उपस्थितांनी ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

उपक्रम राबवण्याचे आवाहन
वैद्यकीय सेवांवरील विशेष सवलत देणे, मतदारांशी जुळण्यासाठी गुगल मिटसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे तंत्रज्ञानाचे साह्य घेणे, माहितीपूर्ण व्हिडीओ तयार करणे आणि जनजागृतीपर मोहिमा राबवणे, आपल्या आस्थापनांमधील कर्मचारी, मजुरांना प्रोत्साहित करण्यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे अथवा सवलत देणे, मतदार जागृती मंच स्थापन करणे आदी विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT