मुंबई

मुंबई-गोवा महामार्गावर कार कंटनेरमध्ये घुसली

CD

मुंबई-गोवा महामार्गावर कार कंटेनरमध्ये घुसली
दोघे जागीच ठार; जखमी रत्नागिरी, पुणे जिल्ह्यातील

पोलादपूर, ता. १० (बातमीदार) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील आंबेडकरनगरसमोर कारचा भीषण अपघात झाला. महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. मुंबईकडून खेडकडे जाणाऱ्या कारने कंटेनरला मागून धडक दिली. यामध्ये दोघे जण जागीच ठार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुटीसाठी मुंबईकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या कारने मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ आंबेडकरनगरजवळ कंटनेर उभा होता. या वेळी अनिल भीमा शिंदे यांची कार कंटनेरच्या मागील भागात भरधाव वेगात घुसली. कंटेनरच्या मागील बाजूस अर्धी कार आत घुसल्याने कारमधील दोघे जण जागीच ठार झाले; तर तीन जण गंभीर जखमी झाले. चालक अनिल भीमा शिंदे (वय ४०, रा. पुणे) व सुमती यशवंत शिंदे (वय ७५) अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. नीलेश अनंत दळवी, जान्हवी नीलेश दळवी (४५), यश नीलेश दळवी (१८) सर्व राहणार खानवली, लांजा) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाणे येथील कर्मचारी, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, नरवीर रेस्क्यू टीम, श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.
*****
फोटोः MUM24E52648

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT