मुंबई

नियंत्रण सुटल्याने कंटेनरला अपघात

CD

ठाणे, ता. १० (वार्ताहर)ः गुजरात-वापी येथून ठाण्याकडे निघालेल्या कंटेनरला माजिवडा उड्डाणपुलावर अपघात झाला आहे. वाहनचालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर कलंडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात कोणीही जखमी नसून चालक मात्र फरारी आहे.
गुजरातच्या वापी येथून जेएनपीटीकडे कोटेड पेपर डुप्लेक्स बोर्ड घेऊन निघालेल्या कंटेनरला घोडबंदर रोडवरील माजिवडा उड्डाणपुलावर शुक्रवारी (ता. १०) सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात घडला. यावेळी कंटेनरमधील ऑईल रस्त्यावर पसरल्याने वाहतूक कोंडी झाली. शहर वाहतूक पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करत वाहतुकीसाठी मार्ग खुला केला. या घटनेमुळे सकाळच्या सत्रातच घोडबंदर रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे पोलिसांनी एका मार्गिकेवरून धीम्या गतीने वाहतूक सुरू ठेवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT