मुंबई

राज्यात उभारणार हायब्रीड एनर्जी पार्क

CD

राज्यात उभारणार हायब्रीड एनर्जी पार्क
‘एनटीपीसी’चा ‘महाप्रीत’सोबत करार; दहा हजार मेगावॉटपर्यंत क्षमता

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन (एनटीपीसी) राज्‍यात ग्रीन एनर्जी ‘हायब्रीड एनर्जी पार्क’ उभारणार आहे. या हायब्रीड एनर्जी पार्कमध्ये तब्बल दहा हजार मेगावॉट क्षमतेचे एकत्रित सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प असणार आहेत. त्यासाठी एनटीपीसीने महात्मा फुले रिन्यएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी (महाप्रीत) या राज्य सरकारच्या कंपनीसोबत करार केला आहे.
राज्याच्या विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत असली तरी औष्णिक वीज प्रकल्पातून कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीवर मर्यादा येत आहेत. तसेच अपुऱ्या पाण्यामुळे जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती करताना हात आखडता घ्यावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर वीज कंपन्यांकडून सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीवर भर दिला जात आहे. त्यानुसार महाप्रीतने एनटीपीसीच्या मदतीने हायब्रीड वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे १० हजार मेगावॉट क्षमतेचे हे प्रकल्प असणार आहेत. तसेच येथे तयार होणारी वीज स्टेट ग्रीडच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवता येणार आहे.

२५ हजार एकर जमिनीची आवश्यकता
एनटीपीसी आणि महाप्रीत सुमारे दहा हजार मेगावॉटचे एकत्रित सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. त्यानुसार पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी जास्त जागा लागत नसली तरी एक मेगावॉटच्या सौर प्रकल्पासाठी पाच एकर जमीन लागते. त्यामुळे हायब्रीड प्रकल्पांतर्गत पाच हजार मेगावॉटचे सौर प्रकल्प उभारण्यासाठी किमान २५ हजार एकर जमिनीची आवश्यकता आहे. त्याच जागेत पवन ऊर्जा प्रकल्पांच्या पवन चक्क्या उभारून वीज निर्मिती करणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: आपल्यावर कुणी हात घालू शकतो त्याने विचार केला नव्हता, पण... पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी सांगितला अटकेचा थरार

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Beed News:मुलींनो एचपीव्ही लस घ्या; लसीमुळे तुम्हाला कोणताच धोका होणार नाही; अनेकांची पाठ; आकडे सांगताहेत भविष्यातील कर्करोगाची वाट; गैरसमज चुकीचा

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

SCROLL FOR NEXT