मुंबई

शिंदे गटाचे चतुर्वेदींविरोधात आंदोलन

CD

ठाणे, ता. १० : कल्याणचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याविरोधात शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात शुक्रवारी जोरदार निदर्शने केली.
शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टेंभीनाका येथील आनंद आश्रमाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. या वेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करत दावोसची गुलाबो.. असा उल्लेख केला. या वेळी बोलताना मीनाक्षी शिंदे यांनी अनेक पक्ष बदलून निष्ठेची वार्ता करणारे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. हेच त्यांचे दुर्भाग्य आहे. तसेच ठाकरे गटाकडे लोकसभा किंवा आगामी निवडणुकीसाठी विकासाची कामे नाहीत. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळे भाड्याने आणलेल्या माणसांकडून वक्तव्य करतात, असा हल्लाबोलही केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT