मुंबई

पोहण्याची हौस बेतली जीवावर

CD

अंबरनाथ, ता. १० (बातमीदार)ः वाढत्या उन्हाच्या तडाख्यात पोहोण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. चिखलोली धरण आणि जीआयपी तलाव परिसरात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
उन्हाचा तडाखा वाढल्याने अनेक हौशी पर्यटक पोहण्याचा आनंद घेण्यासाठी नद्या, धरणपात्रात पोहोण्यासाठी येत आहेत. अंबरनाथच्या चिखलोली धरणात उल्हासनगरच्या तरुणाचा; तर रेल्वेच्या जीआयपी टॅंक धरणात कल्याणच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. उल्हासनगर येथे राहणारा रोहित कामसिंग (१७) हा त्याच्या मित्रांसह अंबरनाथच्या चिखलोली धरणपात्रात पोहण्यासाठी उतरला होता; पण पाण्याच्या अंदाज नसल्याने तो बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवली होती; तर दुसऱ्या घटनेत कल्याणच्या काटेमानिवली परिसरात राहणारा केतन ठाकूर याचा जीआयपी टॅंक परिसरात पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. दोन्ही तरुणांचे मृतदेह शुक्रवारी पाण्याबाहेर काढल्याचे अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन दलप्रमुख भागवत सोनोने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2026

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT