मुंबई

उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई

CD

ठाकरे-शिंदेंसाठी अस्तित्वाची लढाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाईच ठरली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही गट या पहिल्याच निवडणुकीला सामोरे जात आहेत. दोन्ही गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे आता राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
शिवसेना हा पक्ष, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि ठाकरे घराणे यांचे अतूट संबंध होते. शिवसेनेत फूट पडली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले. ठाकरे गट या निवडणुकीत मशाल या चिन्हावर निवडणूक लढत आहे. मशाल हे चिन्ह लोकांच्या मनात रुजविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. त्यांनी जाहीर सभांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आदित्य ठाकरे हेसुद्धा उमेदवारांच्या रॅली, प्रचार सभा घेत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाल्यामुळे त्यांचा प्रचार सोपा वाटत असला तरी लोकांच्या मनात धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना रुजविणे सोपे नाही. मात्र, त्यांनीही जोरदार प्रचाराची मोहीम राबविली आहे. शिंदे गटाला भाजपची आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह महायुतीतील घटक पक्षांची साथ आहे, तर ठाकरे यांच्या पाठीशी आघाडीतील घटक पक्ष आहेत.
राज्यातील १५ पैकी १३ जागांवर आता ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. त्यात मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे (शिंदे गट) आणि अनिल देसाई (ठाकरे गट), मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तिकर (ठाकरे गट), रवींद्र वायकर (शिंदे गट), दक्षिण मुंबई अरविंद सावंत (ठाकरे गट) यामिनी जाधव (शिंदे गट) या तीन लढती महत्त्वाच्या असून, मावळ, शिर्डी, नाशिक, संभाजीनगर, हातकणंगले, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा या सर्वच्या सर्व जागा ठाकरे आणि शिंदे गटाने अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. येथे शिंदे आणि ठाकरे गटाची थेट लढत होणार आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

कल्याण, ठाणे येथे प्रतिष्ठा पणाला
कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे रिंगणात आहेत. त्यांचा सामना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याशी होत आहे. ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर ठाणे मतदारसंघात नरेश म्हस्के (शिंदे गट) आणि राजन विचारे (ठाकरे गट) यांच्यात जुंपली आहे. या दोन्ही जागा मुख्यमंत्र्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत.
…..
नाशिक कोण जिंकणार?
नाशिक मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना अखेर उमेदवारी मिळाली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर गोडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचा पाठिंबा मिळविण्यात त्यांना यश आले आहे. ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी त्यांची लढत होत आहे. ही जागा शिंदे गटाने प्रतिष्ठेची केली आहे.
--------------------
पंतप्रधान मोदी शिंदे गटासाठी मुंबईत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या १५ मे रोजी मुंबईत येत आहेत. या दिवशी त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर १७ मे रोजी मुंबईत रोड शो होणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT