मुंबई

ठाणेकरांनी साधला खरेदीचा मुहूर्त

CD

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ११ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वाळ्यापासून ते विविध नक्षीदार दागिने खरेदीसाठी सराफा दुकानांत ठाणेकरांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. यावेळी सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी पेशवाई हारासह राणीहाराला पसंती देत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

अक्षय्य तृतीया या मुहूर्तावर सोने दागिने, घर, वाहन खरेदीची परंपरा आहे. त्यात यंदा सोने- चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत; मात्र अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे औचित्य साधून ठाण्यातील सराफ दुकानात ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी त्यात मागील वर्षी अक्षय्य तृतीयेला ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादापेक्षा यंदा कमी असला तरी, पाडव्यापेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सोने- चांदीच्या विक्रेत्यांनी दिली. त्यात शुक्रवारी (ता. १०) सोन्याच्या दराने एकाहत्तरी ओलांडली असल्याचे दिसून आले.

महागाई असूनही सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी ग्राहकांनी वाळे, सोन्याची नाणी घेण्याऐवजी राणीहार, मोहन माळ, पेशवाई दागिने आणि गेरू हार आदींना पसंती दिल्याची माहिती ज्वेलर्सचे मालक सुरेश राजवंत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: गडकरींचा शब्द, पण वास्तव वेगळं! मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण, निकृष्ट कामांमुळे संताप, डेडलाईन धोक्यात..

Angarki Chaturthi Special Breakfast: अंगारकी चतुर्थीला बनवा काहीतरी खास! कमी साहित्यात झटपट तयार करा रताळ्याची स्वादिष्ट भाजी

Jannik Sinner: यानिक सिनरसाठी आता पुढचा मार्ग मोकळा?; अल्काराझच्या अनुपस्थितीचा इटालियन, फ्रेंच स्पर्धेत फायदा होण्याची शक्यता!

Vidarbha Heatwave : तापमानाच्या चाळिशीने विदर्भ हैराण; एप्रिल महिन्यात १८ दिवस तापदायक अनुभव

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जमीन मोजणीला शेजारचा विरोध करीत असल्यास काय करावे? मोजणीसाठी ५९० शेतकऱ्यांनी पोलिसांना मोजले ३० लाख रुपये, वाचा...

SCROLL FOR NEXT