मुंबई

सहलीसाठी घेतलेले २० लाख हडपले

CD

सहलीसाठी घेतलेले २० लाख हडपले
- ट्रॅव्हल्‍स व्यावसायिकाला अटक
अंधेरी, ता. ११ ः सहलीसाठी पर्यटकांकडून घेतलेल्‍या सुमारे २० लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला कांदिवली पोलिसांनी अटक केली. तेजस महेंद्र शहा असे या आरोपी व्यावसायिकाचे नाव असून त्याच्या मालकीची एक ट्रॅव्हल्स कंपनी आहे.
तक्रारदार कांदिवलीत राहत असून एका सॉफ्टवेअर कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून काम करतात. मार्च महिन्यात त्यांनी कुटुंबीयांसह नातेवाईक आणि मित्रांसोबत दक्षिण आफ्रिकेला जाण्याचे नियोजन केले होते. याच दरम्यान त्यांची ओळख तेजस शहा याच्याशी झाली होती. तेजसची पूर्वा हॉलिडेज नावाची एक कंपनी असून त्याने त्यांच्या सहलीसाठी एक पॅकेज दिले होते. त्यांनी नऊ जणांचे बुकिंग करून तेजसच्या कंपनीच्या बँक खात्यात २० लाख ४१ हजार रुपयांचे पेमेंट केले होते.
मार्च महिन्यात त्यांनी तेजसला सहलीबाबत विचारणा केली असता त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तो उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या कार्यालयात जाऊन पाहणी केल्यानंतर तेजसने कार्यालय बंद करून पलायन केल्याचे दिसून आले. १० एप्रिलला संपर्क झाल्यानंतर त्यांनी तेजसकडे सहल रद्द करून घेतलेल्या पैशांची मागणी केली होती. त्याने पैसे देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, दिलेल्या मुदतीत पैसे परत केले नाहीत. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तेजस शहाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

Flipkart-Axis Bank ची मोठी घोषणा! कार्ड पेमेंटसाठी आता OTP ची गरज नाही

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Thane: ऐन उन्हाळ्यात ठाण्यावर पाणीकपातीचे सावट, मुंबईतील निर्णयामुळे परिणामाची शक्यता

SCROLL FOR NEXT