मुंबई

स्थिर सर्वेक्षण पथक सक्रिय

CD

कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने उसाटणे नाक्यावरील नवी मुंबईकडून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान पथकाला बेकायदा वस्तू आणि दोन लाख आठ हजार ३७० रक्कम आढळली. ही रोख रक्कम आणि बेकायदा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
उसाटणे नाका या ठिकाणी नवी मुंबईकडून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहेत. या वेळी तपासणी दरम्यान वाहनचालकाच्या बाजूच्या सीटवर दोन पिशव्या निदर्शनास आल्या. त्याबाबत संबंधित वाहनचालकाला स्थिर सर्वेक्षण पथकाने विचारणा केली असता, त्या‍मध्ये रोख रक्कम असल्याचे सांगितले. परंतु, रकमेबाबत संबंधित व्यक्तीने काहीही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे स्थिर सर्वेक्षण पथकाने रक्कम ताब्यात घेत पंचनामा केला. रात्रीच्या वेळी उपकोषागार कार्यालय बंद असल्यामुळे हिललाईन पोलिस ठाण्यात हे लिफाफे सिलबंद करून त्यावर पंचांच्या व पथकप्रमुखाच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. या रकमेचे लिफाफे आता एका स्टिलच्या पेटीत कुलूप बंद करून कल्याण कोषागारात सिलबंद करण्यात आले आहेत. तसेच ते स्ट्राँगरूममध्ये ठेवल्याची माहिती पथकाचे प्रमुख राहुल गायकवाड यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT