मुंबई

दुरुस्ती कामामुळे पाणी गळती थांबली

CD

रसायनी, ता. ११ (बातमीदार) : रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथे एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्राला अशुद्ध पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी एचओसी कॉलनीत फुटली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन वाया जात असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत होते. एमआयडीसीच्या पाताळगंगा नदीवरील उदंचन केंद्रातून अशुद्ध पाणी उचलून या मोठ्या जलवाहिनीतून वासांबे मोहोपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रात सोडण्यात येत आहे. या ठिकाणी पाणी शुद्ध करून गाव आणि कारखान्यांना पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, जलवाहिनी फुटली असल्याची बाब जागृत नागरिकांनी एमआयडीसीच्या निदर्शनास आणून दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानंतर एमआयडीसीने नुकतेच दुरुस्तीचे काम करून पाणी गळती थांबवली असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे. वासांबे मोहोपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून रसायनीतील तसेच पनवेल तालुक्यातील इतर ग्रामपंचायत आणि रसायनीतील कारखान्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Gas Cylinder Shortage: बीडमध्ये घरगुती-व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; ग्राहक रांगेत; साठा असूनही गॅस नाही

Latest Marathi News Live Update : ओडिशात आगीत दहा रुग्णांचा मृत्‍यू

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

Pandharpur News: पंढरपुरातील इस्काॅन मंदिरात प्रसादासाठी पेटल्या चुली; अन्नछत्रालाही गॅस टंचाईचा मोठा फटका, भाविकांच्या भोजनावर मर्यादा!

Beed Road Construction Issue: रस्ता कामाला अडथळ्यांचा फेरा; बीडमध्ये चौपदरीकरणाचा वेग मंदावला; खोदकाम, धुळीचे लोट आणि वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT