मुंबई

युजीसी नेट परीक्षेसाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ

CD

मुंबई, ता. ११ : देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विविध विषयांमध्ये पीएचडीसाठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट या परीक्षेची मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १० मे होती.
यूजीसी नेट या परीक्षेचे नियोजन मागील काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)च्या मार्फत केले जाते. यंदाही एनटीएमार्फत ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. देशभरात लोकसभा निवडणुका सुरू असल्याने अनेक शिक्षक, कर्मचारी हे या निवडणूक कामात असल्याने यूजीसी नेटसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार १५ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहील. तसेच १६ ते १७ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत विद्यार्थी परीक्षा शुल्क भरू शकतात. ऑनलाईन प्रवेश अर्जात काही सुधारणा करायची असल्यास त्यासाठी १८ ते २० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ugcnet.nta.ac.in या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल. यूजीसी नेट परीक्षेला बसणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १ हजार १५० रुपये प्रवेश शुल्क आहे; तर ईडब्लूएस, ओबीसी, एनसीएल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये आणि एसटी, एससी, दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी ३२५ रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT