मुंबई

रेल्वेतील गर्दीने तरुणाचा बळी

CD

कळवा, ता. ११ (बातमीदार)ः मुंब्रा-कळवादरम्यान जलद मार्गावर २८ वर्षांचा तरुण पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १०)घडली. गेल्या दोन महिन्यांत मुंब्रा-कळवादरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडल्याची ही पाचवी घटना असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची मागणी होत आहे.
कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघालेल्या लोकलमधून शुक्रवार सायंकाळी सहाच्या सुमारास प्रवास करणाऱ्या तरुणाचा मुंब्रा-कळवादरम्यान पारसिक बोगद्याच्या जलद मार्गावर तोल जाऊन पडल्याची घटना घडली आहे. या तरुणाला उपचारासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या मुलाची ओळख अद्याप पटली नसून ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून तपास केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत मुंब्रा-कळवादरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून प्रवासी पडल्याची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंब्रा ते ठाणे दरम्यान जादा लोकल चालवाव्यात, अशी मागणी मुंबई उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस सिद्धेश देसाई यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT