मुंबई

‘स्विगी डाइनआऊट’ मतदानादिवशी खास डायनिंग ऑफर

CD

‘स्विगी’कडून मतदानादिवशी खास ऑफर
पुणेकरांना आवाहन, शाई लावलेलं बोट दाखवून ५० टक्क्यांची सूट

पुणे, ता. ११ : सध्या देशभर लोकसभा निवडणुका होत असून महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी मतदान होत आहेत. सोमवारी (ता. १३) पुण्यात मतदान होत आहे. त्यानिमित्त स्विगी डाइन आऊटने मतदारांना आकर्षित करण्यासाठी व कर्तव्य पार पाडण्यासाठी एक ऑफर आणली आहे. सोमवारी शहरात मतदान होणार आहे. त्यानिमित्त स्विगीने मोठ्या हॉटेलमध्ये मतदारांना मोठी सूट दिली आहे. मतदारांनी १३ मे रोजी बोटाला लावलेली शाई दाखवून पुणेकरांना जेवणाच्या बिलात ५० टक्क्यांची सूट मिळेल. एफिंगट बिस्ट्रो, सर्किट हाऊ, द मार्केट-द वेस्टिन, इस्काडा ऑल डे किचन अँड बार, स्काय स्टोरीज, सर्किट हाऊस अशा अनेक हॉटेल्समध्ये ही ऑफर असणार आहे.
मतदान प्रक्रियेत नागरिकांनी अधिकाधिक सक्रिय होण्यासाठी स्विगी डाइनाऊटची भूमिका आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना स्विगी डाइनआऊटचे प्रमुख स्वप्नील बाजपेयी म्हणाले, ‘‘मतदान हा फक्त हक्क नाही, तर ती एक जबाबदारी आहे. नागरिकांनी यामध्ये सक्रिय होण्यासाठी स्विगी डाइनआऊटकडून ही सूट दिली आहे. त्यामुळे आम्ही पुणेकरांना मतदान करण्याचे आणि त्यानंतर तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये तुमच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारण्याचे आवाहन करत आहोत. तसेच नागरिक त्यांच्या अधिकाराचा वापर करून देशाचे भविष्य घडवण्यात सहभाग घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुणे आत मतदानासाठी तयार आहे. स्विगी डाइनआऊट नागरिकांना मतदान आणि बाहेर जेवण अशा दोन्ही गोष्टींचा आनंद घेण्याचे आमंत्रण देत असल्याचे सांगत आपला आवाज दूरवर पोहोचेल, याची तजवीज करू या आणि सक्रिय समाज घडवूया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोटात जोराची कळ, हायवेवर शौचालय दिसेना, गाडी पळवल्यानं मलाच ४ वेळा दंड झाला; न्यायमूर्तींनी NHAIला फटकारलं

BJP MLA: पाणी प्रश्नावर आवाज उठवला तर BJP आमदाराने थेट पायच तोडले... नेमकं काय घडलं? अजून एकालाही अटक नाही

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Pune News : सदनिकाधारक, भाडेकरूंना मोठा दिलासा; भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकांवर अतिरिक्त सेवा शुल्क आकारता येणार नाही

SCROLL FOR NEXT