मुंबई

कोंढरीपाडा ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

CD

कोंढरीपाडा ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
उरण, ता. ११ (बातमीदार) : मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील कोंढरीपाडा येथील आराध्य ग्रामदैवत हनुमानाच्‍या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला अद्यापही प्रशासनाकडून शासन न झाल्‍यामुळे ग्रामस्‍थांनी रोष व्‍यक्‍त केला आहे. तसेच यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मावळ लोकस‌भा मतदारसंघाची निवडणूक १३ मे २०२४ रोजी होत आहे. यात पुणे व रायगड जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश आहे. निवड‌णुकीची तारीख जवळ आल्याने दिवसेंदिवस राजकीय वातावरण अधिकच तापू लागले आहे. मात्र, कोंढरीपाडा येथील ग्रामस्‍थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्‍याने राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे. आगरी कोंढरी पाड्यातील हनुमंताच्या मूर्तीची विटंबना मागील वर्षी ६ मे २०२३ रोजी झाली होती. येथील गावकरी भालचंद्र नारायण पाटील या समाजकंटकाने ही मूर्ती विटंबना केली होती. संबंधित व्यक्तीवर उरण पोलिस ठाण्यात त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत रीतसर एफआयआरदेखील नोंदविण्यात आला आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे ग्रामदेवतेच्या विटंबनेबाबत गुन्हेगारावर कोणतीही कारवाई न होता न्याय मिळण्यास दिरंगाई होत असल्याने ग्रामस्‍थांकडून रोष व्‍यक्‍त करण्यात येत आहे. तसेच सर्व ग्रामस्थांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

SCROLL FOR NEXT