मुंबई

वारकरी भवनासाठी पालिकेचा करार

CD

कल्याण, ता. १२ (वार्ताहर) : महापालिका क्षेत्रात प्रशस्त वारकरी भवन व्हावे, ही वारकरी संप्रदायाची अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यानुसार कल्याण शहरात वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवाभावी ट्रस्टला महापालिकेने गंधारे माधव संकल्प इमारतीच्या बाजूला असलेला भूखंड भाडेतत्त्वावर दिला आहे. याच भूखंडावर वारकरी भवनाच्या नामफलकाचा अनावरण सोहळा आदर्श आचारसंहितेचे पालन करून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडला.
वारकरी व महिला उद्योग भवनाच्या उभारणीसाठी निधी कमी पडून देणार नसल्याचे आश्वासन यावेळी उपस्थितांनी वारकऱ्यांना दिले. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सभागृहाने २० नोव्हेंबर २०१३ रोजी झालेल्या सभेत तत्कालीन नगरसेवक सुनील वायले यांच्या प्रभाग क्रमांक २ गंधारे येथील माधव संकल्प या इमारतीच्या बाजूला वारकरी भवन आणि महिला उद्योग केंद्र उभारण्याच्या ठरावाला मान्यता दिली. त्यानुसार प्रशासनाने ट्रस्टला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय नुकताच घेतला. तसा भाडे करारही नोंदणीकृत केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SNDTतून प्रथमच ‘पुरुष’ पदवीधर! लिंग बदललेल्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्याचे हायकोर्टाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Cleaning Cmpaign : तरुण कार्यकर्ते आणि महापालिकेची संयुक्त कारवाई; प्लास्टिक व शेवाळ हटवत खण झाला स्वच्छ

Latest Marathi News Live Update : जालन्यात 51 रुपयात साडीची ऑफर , दुकानासमोर महिलांची गर्दी..

"वडील बेपत्ता, आई विष देऊन मारणार होती.." शक्तिमान फेम अभिनेत्रीची बालपणीची धक्कादायक आठवण

Rahul Gandhi: ‘एपस्टीन’चा वापर करून सहीसाठी दबाव; भारत-अमेरिका करारावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप

SCROLL FOR NEXT