मुंबई

मतदारांची प्रतिक्रिया

CD

पर्यावरण समतोल या महत्त्वाच्या विषयावर अद्याप कोणीच बोलत नाही. आजचे वाढते तापमान व पर्जन्यमानातील विलक्षण तफावत पाहता ग्लोबल वार्मिंगमुळे होणाऱ्या जगबुडीच्या आपण किती जवळ आहोत, याची प्रचिती येते. ग्रीन सिटी, ग्रीन व्हिलेज यांसारख्या योजना आवश्यक आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी पर्यावरणाबाबत आपली ठाम भूमिका मांडली पाहिजे.
- प्रा. सुनील कर्पे, समाजिक कार्यकर्ते, कामोठे
..........................

देशाच्या विकासात तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वात आधी मतदानाच्या माध्यमातून तरुणांनी लोकशाही उत्सवात सहभाग घेतला पाहिजे. लोकशाही व्यवस्था समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व प्रश्नांची माहिती तरुणांना असली पाहिजे. असे असेल तर लोकप्रतिनिधी निवडणे सोयीचे होते. जिल्ह्याच्या विकासाची दृष्टी असणारा उमेदवार लोकसभेत पाठवण्यासाठी तरुणांनी मतदानाचा अधिकार वापरला पाहिजे.
- सोमनाथ मालघर,
उद्योगपती, तळोजा औद्योगिक वसाहत
......................................
कुठेही फिरा, सर्वात आधी खड्ड्यांचा सामना लोकांना करावा लागतो. शहर असो की खेडे, कुठेच रस्ते चांगले नाहीत. त्यामुळे चांगले रस्ते व्हावेत, ही सर्वांचीच अपेक्षा आहे. सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणून तो रस्त्यांसाठी खर्च केला तरच सर्वसामान्यांचे जीवन सुखकर होईल. त्यासाठी योग्य उमेदवाराला मतदान करा.
- सचिन बोराटे, युवा मतदार, रोडपाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT