मुंबई

रविवार ठरला प्रचार दिन

CD

वसई, ता. १२ (बातमीदार) : सुट्टीचा दिवस नागरिक घरी असणार हे हेरून रविवारी प्रचाराला गती आली होती. पालघर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी उमेदवार, नेतेमंडळी आणि कार्यकर्ते कामाला लागले होते. नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या जात होत्या. मतदानाला आठ दिवस शिल्लक असताना रविवारी जोरदार निवडणुकीच्या प्रचारात मुसंडी मारल्याचे दिसून आले.
पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील, महाविकास आघाडीतून भारती कामडी आणि महायुतीचे डॉ. हेमंत सवरा यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार हे मतदान मोजणीनंतर स्पष्ट होईल. तत्पूर्वी विविध पक्षांचे नेते पालघरमध्ये दाखल होत आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. विकासाचा अजेंडाही हाती घेण्यात आला आहे. विकासकामे होत असताना त्याचे समर्थन, तर कुठे विरोधाची धारही दिसून येऊ लागली आहे. अशातच कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात प्रचाराची गाडी हाकत आहेत.

पालघर मतदारसंघात २१ लाख ४८ हजार ५१४ मतदार आहेत. यात महिलांची संख्या १० लाख २३ हजार ५० इतकी आहे. त्यामुळे महिला मतदारही अधिक असल्याचे दिसून येत आहे. महिला वर्ग बऱ्यापैकी रोजगारासाठी बाहेर असतात. अशा वेळी रविवार सुट्टीचा दिवशी त्या घरी भेटतील, हे कार्यकर्त्यांनी हेरले हाेते. त्यामुळे हा दिवस वाया जाऊ न देता भर उन्हातही उमेदवार, कार्यकर्ते चौक सभा, घरोघरी भेट देणे; तसेच प्रचारसभेसाठी फिरत होते. वाहनांनीही प्रचार सुरू करण्यात आल्याचे चित्र रविवारी सकाळपासून दिसून आले. उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून काही ठिकाणी हा प्रचार सकाळी लवकर व सायंकाळी ठेवण्यात आला होता.
--------------------
उमेदवारांची धडपड
वसई, जव्हार, मोखाडा, डहाणू, नालासोपारा, पालघर, बोईसर यांसह ग्रामीण भागांतील दौरे रविवारी मोठ्या प्रमाणात दिसून आले. तापमान अधिक असल्याने उमेदवारांची दमछाक झाली; मात्र विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रत्येक उमेदवाराची धडपड सुरू होती.
------------------
वसई, नालासोपाऱ्यात जाेर अधिक
वसई आणि नालासोपारा विधानसभेत मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरी भागातील गृहसंकुले, ग्रामीण परिसरातील नागरिकांना भेटी दिल्या जात आहेत. रविवारी प्रचाराचा जोर अधिक होता आणि मतदारांना विकास कामांबाबत माहिती देण्यात येत आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT