मुंबई

वाढवण बंदर रद्द करा; नंतरच मत मागायला या

CD

वाढवण बंदर रद्द करा; नंतरच मते मागायला या
मच्छीमारांनी राम नाईक यांना सुनावले

पालघर, ता. १२ (बातमीदार) ः ‘आपण सातपाटीच्या मच्छीमारांसाठी विकासकामे केली आहेत. त्यामुळे आपल्याला पाच वेळा खासदार म्हणून निवडून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली; मात्र आपल्या भाजप सरकारने आमच्यावर वाढवण बंदर लादून आम्हाला देशोधडीला लावण्याचा विडा उचलल्याने तुम्ही आपल्या उमेदवारासाठी मत मागायला येणार असाल, तर आम्हाला माफ करा. आधी वाढवण बंदर रद्द करा; नंतरच मते मागायला या,’ अशा शब्दांत सातपाटीकर मच्छीमारांनी माजी राज्यपाल राम नाईक यांना सुनावले.
‘वाढवण बंदराला विरोध करणारे दलाल’ असा प्रचार भाजपच्या व्यासपीठावरून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केल्यानंतर त्याचे सर्वत्र पडसाद उमटत असून महायुतीविरोधात किनारपट्टीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा अडचणीत सापडले आहेत. अध्यक्षांच्या वक्तव्याशी महायुतीचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असले, तरी त्यानंतरही मच्छीमार व स्थानिकांमधील रोष कमी होत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. त्यामुळे मच्छीमारांचे मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम नाईक यांना महायुतीकडून सातपाटी येथे शुक्रवारी (ता. १०) पाचारण करण्यात आले होते. या वेळी त्याच्या सभेला सातपाटी गावातून अल्प प्रतिसाद मिळाला. दरम्यान, राम नाईक यांनी सातपाटी श्रीराम मंदिराच्या पटांगणात नेहमीप्रमाणे उपस्थित मच्छीमारांना भावनिक साद घालीत त्यांच्या कारकिर्दीत डिझेलवर एक रुपया ३५ पैसे परतावा मिळणे, राम मंदिर उभारणे आदी कामांचा उल्लेख करीत हे काम पंतप्रधानांनी केल्याने आपण डॉ. सावरा यांना त्यांचे प्रतिनिधी म्हणून मत दिले पाहिजे, असे आवाहन केले.
...
बॅनरला काळे फासले
सातपाटी येथे राम नाईक यांच्या कार्यक्रमाच्या बॅनरला काळे फासून स्थानिक मच्छीमारांनी वाढवणबाबतचा आपला राग व्यक्त केला. समाजमाध्यमांवर अनेक संदेश पोस्ट करूनही स्थानिकांनी वाढवण बंदराविरोधात आपला संताप व्यक्त केल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT