मुंबई

महावितरणचे मिशन ग्रीन एनर्जी

CD

महावितरणचे ‘मिशन ग्रीन एनर्जी’
विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी १००० मेगावॉट हरित ऊर्जा खरेदी करणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महावितरण मिशन ग्रीन एनर्जीअंतर्गत तब्बल १ हजार मेगावॉट वीज सौरऊर्जा प्रकल्पातून खरेदी करणार आहे. त्यासाठी कंपनीने खुल्या निविदा मागवल्या असून पुढील दोन वर्षांत सौर प्रकल्प उभारून वीजपुरवठा करणे बंधनकारक आहे.
महावितरणचे सध्या जवळपास ३५ हजार मेगावॉटहून अधिक क्षमतेचे वीज खरेदी करार आहेत; मात्र त्यामध्ये औष्णिक वीज प्रकल्पांचे प्रमाण जास्त आहे. मात्र अनेकदा कोळसाटंचाईमुळे पुरेशी वीज उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होतात. त्यातच अपारंपरिक ऊर्जा वापराचे उद्दिष्ट पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे खुल्या बाजारातून महागडी वीज खरेदी करण्यापेक्षा वीज खरेदी कराराच्या माध्यमातून पुढील २० वर्षांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज उपलब्ध व्हावी, म्हणून खुली निविदा मागविण्यात आली आहे. यामध्ये पात्र वीज कंपनीला देशात कुठेही वीज प्रकल्प उभारता येणार आहे.

..
प्रतियुनिट विजेचा दर तीन रुपयांच्या घरात
महावितरण दीर्घकालीन खरेदी कराराच्या माध्यमातून वीज घेणार आहे. त्यामुळे विजेची किंमत ई-रिव्हर्स बिडिंगद्वारे निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, या नियोजित वीज प्रकल्पात तयार होणाऱ्या प्रतियुनिट विजेचा दर २.९० रुपये ते ३.४० रुपयांपेक्षा जास्त असू नये, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे परवडणाऱ्या दरात महावितरणला आणि पर्यायाने ग्राहकांना उपलब्ध होऊ शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Bird: चातक आफ्रिकेतून एप्रिलमध्येच आला मुक्कामी, दोन महिने आधीच आगमन; मान्सून लवकर सक्रिय होणार?

IPL 2026: राजस्थानची अग्निपरीक्षा २६५ धावा चेस करणाऱ्या वादळी पंजाबला रोखणार कसं? श्रेयस अय्यरचा मास्टरप्लॅन तयार, पाहा संभावित Playing XI

Nitesh Rane: नीतेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा अन् १ लाखाचा दंड; पण शिक्षेला स्थगिती

Akola News: मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीच्या कामांना वेग; महावितरण; सकाळच्या सत्रात काम करण्याचे नियोजन

Akola News: बाळापूर तालुक्यात आरटीई प्रवेशाचा ‘बाजार’; मध्यस्थांकडून पालकांची आर्थिक लूट? गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी

SCROLL FOR NEXT