मुंबई

वज्रेश्वरी देवीचा नयनरम्य पालखी सोहळा

CD

वज्रेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत वज्रेश्वरी देवीचा पालखी मिरवणूक सोहळा वज्रेश्वरी देवी यात्रोत्सव झाला. वज्रेश्वरी योगिनी देवीचा यात्रोत्सव ७ ते १० मेदरम्यान तीन दिवस सुरू होता. या यात्रोत्सव काळात गुजरात मुंबईसह महाराष्ट्रातून भाविक लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. या यात्रोत्सवादरम्यान वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानचे विश्वस्त मंडळ तसेच वज्रेश्वरीचे सरपंच रमेश जाधव, उपसरपंच सायली पाठारी, ग्रामसेवक प्रमोद भोईर व येथील कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या.

गणेशपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके व स्थानिक ग्रामस्थांनी नियोजित केल्याने भाविकांची गैरसोय झाली नाही. वज्रेश्वरी देवीचे मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. चैत्र अमावस्येला रात्री बारा वाजता ढोल-ताशा व टाळ- मृदंगाच्या गजरात वज्रेश्वरीच्या मंदिरातून देवींची पालखी खाली उतरवण्यात आली. या वेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. वज्रेश्वरी देवी संस्थानाने भाविकांसाठी पालखी दर्शनासाठी येथील दीपस्तंभाजवळ व्यवस्था केली होती. दरम्यान गणेशपुरीचे सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT