मुंबई

पंतप्रधान मोदींच्या सभेला एक लाख जण उपस्थित राहतील!

CD

पंतप्रधान मोदींच्या सभेला एक लाख जण उपस्थित राहतील!

कल्याण, ता. १२ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १५ मे रोजी कल्याणमध्ये होणाऱ्या भव्य सभेला एक लाख नागरिक उपस्थित राहतील, अशी माहिती महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या या निवडणुकीतून तिन्ही मतदारसंघांत मोदीमय वातावरण निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आधारवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर १५ मे रोजी दुपारी अडीच वाजता मार्गदर्शन केले जाणार आहे. या मैदानाबरोबरच व्यासपीठ व अन्य सुविधांची कपिल पाटील यांनी पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सातत्याने महायुतीला जनतेचे समर्थन मिळत आहे. त्यामुळे मोदी यांची होणारी सभा विक्रमी होईल. तसेच भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा विजय होईल, असे पाटील यांनी सांगितले. मोदी यांच्या संकल्पनेतून देशाचा विकास होत असून, त्यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जनतेने भरघोस मतदान करावे. सध्या उन्हाची तीव्रता असली तरी देशासाठी मतदान करण्यासाठी एक दिवस द्यावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, शहराध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT