मुंबई

संजय राऊत यांची मोदी-शहांवर टीका संजय राऊत यांची पंतप्रधानांवर सडकून टीका

CD

संजय राऊत यांची मोदी-शहांवर टीका

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ ः शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी कल्याणच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर सडकून टीका करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचाही खरपूस समाचार घेतला.
भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांची प्रचारसभा कल्याण पश्चिम येथे झाली. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत उपस्थित होते. या वेळी त्यांनी आपल्या शैलीत जोरदार बॅटिंग केली. ते म्हणाले, पंतप्रधान गेली दहा वर्षे देशाला चुना लावत फिरत आहेत. तुम्ही गुजरातला सोन्याने मढवा, मला त्याबद्दल काही म्हणायचे नाही; पण तुम्ही त्यासाठी महाराष्ट्राची लूट कशासाठी करता, हा आमचा प्रश्न आहे. ही लूट सुरू असताना या राज्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री मराठी माणसाची लूट पाहत आहेत, हे दुर्दैव आहे. दरम्यान, बाळ्यामामा हे शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. यावरून बोलताना राऊत म्हणाले, मामाच्या अंतरंगात आजही भगवा आहे. हे इथल्या शिवसैनिकांनी विसरू नये. त्यामुळे मामा आपल्या सगळ्यांचा माणूस आहे.
...
गद्दारांचा सरदार ठाण्यात!
महाराष्ट्रात शिवसेनेला गद्दारीचा जो कलंक लागला तो दुर्दैवाने या ठाणे जिल्ह्यातून लागला. त्याचा सरदार ठाण्यात आहे. हा कलंक पुसायचा असेल, तर आपल्याला ही लोकसभेची निवडणूक जिंकायला हवी, असे संजय राऊत या वेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT