Mahuli Fort Traveller bidur
मुंबई

माहुली गडावरून दरीत कोसळलेल्या नांदेडच्या तरूणाची सुटका

गडावर ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करत असताना त्याचा तोल जाऊन ३०० फूट दरीत कोसळला

सकाळ वृत्तसेवा

सरळगाव : माहुली गडावरून दरीत पडलेल्या तरुणाची जीवरक्षक टीमने सुखरूप सुटका केली. नांदेड येथील कपिल कसबे हा तरुण शहापूर तालुक्यातील माहुली गडावरील ऐतिहासिक वास्तू तसेच दुर्मिळ मूर्ती (शिल्प) यांचा अभ्यास करण्यासाठी शनिवारी (ता. ११) आला होता. गडावर ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करत असताना त्याचा तोल जाऊन ३०० फूट दरीत कोसळला. या तरुणाला जीवरक्षक टीमने वनविभाग, पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.

माहुली गडाच्या दरीत तरुण कोसळल्याची माहिती मिळतातच शहापूरमधील जीवरक्षक टीमने तत्काळ माहुली गडावर धाव घेत वनविभाग, पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. गड परिसरातील खोर गावाच्या दुर्गम भागात हा तरुण अडकला होता. दशरथ व दिगंबर आगिवले यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी तरुणापर्यंत पोहोचण्यात यश प्राप्त केले. ज्या ठिकाणी तो तरुण अडकला होता, तेथील वाट बिकट व निसरडी आहे. तसेच तरुणाच्या पायाला व कंबरेला गंभीर दुखापत झाल्याने त्याला वरती काढण्यासाठी बकेट स्ट्रेचरची गरज होती. त्यामुळे अंधार झाल्याने ही मोहीम थांबवण्यात आली. पुढील मोहिमेसाठी लोणावळा येथील डेला अॅडव्हेंचरचे गणेश गिते यांना पाचारण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पहाटे अमित तावडे, अशोक रगडे, रमेश डिंगोरे, सुयोग जगे, अक्षय शहाणे, जय गवळी व मैत्रय वडके हे गणेश गित व त्यांच्या पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पुन्हा एकदा पहाटे पाच वाजता मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेत जखमी कपिल कसबे याला पाच ते सहा तासांच्या खडतर प्रयत्नाने दरीतून काढण्यात आले. या बचाव पथकात दोन वैश्य समाजातील युवकांचा समावेश होता. त्यामुळे या तरुणांचे वैश समाजाच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT