मुंबई

शहापूरला तालुक्याला अवकाळीचा फटका

CD

किन्हवली, ता. १३ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारा व मेघगर्जनेसह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लग्नाचे मंडप कोसळून पडले. गेल्या अनेक दिवसांपासून शहापूर तालुक्यातील तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंशांपर्यंत चढलेला होता. उष्णतेमुळे अंगाची लाही लाही झाली होती. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्यामुळे दिलासा मिळाला असला तरी थंडोळखांब, कसारा, शेणवा, किन्हवली, टाकीपठार, सोगाव, वाशिंद आदी परिसरातील ग्रामीण भागात विविध प्रकारचे नुकसान झाले आहे.

दुपारी वादळी वारा व मेघगर्जनेसह अचानक आलेल्या पावसामुळे तालुक्यातील नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी लग्न व हळदी समारंभासाठी सजावट केलेल्या नक्षीदार व आकर्षक मंडपाच्या कापडातून पाण्याच्या धारा ओघळत होत्या. मंडपात चिखल-माती झाली होती. पाहुण्यांसाठी केलेला स्वयंपाक व सोयी-सुविधा वाया गेल्याने यजमानांचे नुकसान झाले. सजावटीचे महागडे कापड, विद्युत व्यवस्था पावसात भिजून मंडप डेकोरेशनवाल्यांचेही अतोनात नुकसान झाले. तसेच पाऊस लांबलाच तर गुरांच्या वैरणीची व्यवस्था करून ठेवलेला पेंढा भिजून गेला.

मंडप डेकोरेटर्सना दरवर्षी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे अतोनात नुकसान तर होतेच; परंतु प्रशासनही आमच्या नुकसानीची कधीच दखल घेत नाही. त्यामुळे व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे.
- चंद्रकांत देसले, मंडप डेकोरेटर्स, डोळखांब

किन्हवली : वादळ व पावसामुळे लग्नाचा मंडप कोसळून पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

SCROLL FOR NEXT