मुंबई

भूमिगत मामावंती देवीचा बुधवारपासून यात्रोत्सव

CD

विरार (बातमीदार) : वसई तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सत्पाळे गावातील भूमिगत श्री मामावंती देवी बुधवारी (ता. १५) सायंकाळी ठीक पाच वाजता दर्शनासाठी बाहेर काढण्यात येणार आहे. २१ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता देवीची मिरवणूक काढून, देवी पूर्ववत भूमिगत करण्यात येणार आहे. १५ ते २१ मेदरम्यान यात्रोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१५ मे रोजी श्री मामावंती देवी दर्शनासाठी वाजत-गाजत भंडारआळी गावात आगमन होणार आहे. याच दिवशी सत्यनारायण महापूजा आणि नारदीय कीर्तन हभप कैलास बुवा खरे (पुणे) यांचे देवीमहात्म्य व कथा राखा कुंभार या विषयावर नारदीय कीर्तन होणार आहे. सहा दिवसांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अभंग वाणी- श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, नवाळे, बुवा दत्तात्रय वर्तक, लायन्स क्लब आगाशी, समाजकल्याण न्यास पालघर, श्री जलाराम आरोग्य केंद्र व हरेकृष्ण नेत्र चिकित्सालय पुरस्कृत आरोग्य शिबिर, हळदी- कुंकू सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert: आषाढी वारी पालखी आगमनादिवशी पुण्यात पालखी मार्गावरील वाहतूक तीन टप्प्यांत बंद

१५ व्या वर्षी इंग्लंडमध्ये ३ शतके, ८७८ धावा अन् २४ विकेट्स! वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा पठ्ठ्या चमकला

Vasai Fort Risk: मुसळधार पावसाने वसई किल्ल्याला धोका; भुयारात पाणी साचले, भिंती-वास्‍तू धोकादायक

Kabaddi Awards: कबड्डी संघटनेचे पुरस्कार जाहीर; ‘सकाळ’च्या कडकालेंचाही सन्मान, तर पाटील, खटावकर यांना ‘जीवन गौरव’

Maharashtra Rain: सतर्कतेचा इशारा! महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा धोका; पण कुठे? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT