मुंबई

मोखाड्यात तीन दिवसांपासून नुकसान

CD

मोखाडा, ता. १३ (बातमीदार) : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून विविध परिसरांत वादळासह अवकाळी पावसाने धुमशान घातले आहे. सोमवारी (ता. १३) झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने तालुक्यातील अनेक भागांतील गाव-पाड्यांमधील घरांचे नुकसान केले आहे. पावसाळ्यापूर्वी अवकाळीने घरावरील छप्पर उडवल्याने घराची डागडुजी करण्याचा मोठा प्रश्न आदिवासी बांधवांसमोर उभा राहिला आहे.

मोखाडा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी वादळी पाऊस कोसळत आहे. मात्र, सोमवारी तालुक्यातील काही भागांत वादळी, तर काही भागांत गारांचा पाऊस कोसळला. त्यामुळे वेगवेगळ्या भागांत घरांवरील छप्पर उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील आसे आणि चास ग्रामपंचायतीमधील गाव-पाड्यांना सर्वाधिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धामोडी येथील प्रकाश वाजे, तर चास पांगरी येथील ढवळू वाजे यांसह अन्य गाव-पाड्यांतील आदिवासींच्या घरावरील छपरे या वादळी पावसाने उडवली आहेत.

ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच घरावरील छप्पर अवकाळीने उडविल्याने येथील आदिवासींचा संसार उघड्यावर आला आहे. घरांची डागडुजी कशी करायची, असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

पंचनामे करण्याचे आदेश
दरम्यान, नुकसानग्रस्त भागातील माहिती तलाठ्यांकडून येत आहे. तसेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती तहसीलदार मयूर खेंगले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT