मुंबई

जिल्ह्यात अवकाळी पावसाची धुमाकूळ

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने सोमवारी (ता. १३) सोसाट्याच्या वाऱ्यासह धुमाकूळ घातला आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, बदलापूर तर ग्रामीण भागातील शहापूर आणि मुरबाड भागातदेखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान, या कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरातील विविध भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या, त्यामुळे दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. तर अनेक भागांतील बत्ती गुल झाल्याने नागरिक हैराण झाले होते.

मागील महिन्यांपासून वाढत्या उन्हाच्या काहिलीमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्या सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले होते. त्यात उष्णतेतदेखील वाढ झाली होती. सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून सोसाट्यासह रिमझिम अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढत पावसाने धुमाकूळ घातला. या अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडाली होती. तर, दुसरीकडे पावसामुळे सुखद गारव्‍याचा अनुभव घेतला. लग्नसराईचा हंगाम सुरू असून दुपारीही बाजारात गर्दी दिसून येते; मात्र अचानक आलेल्या पावसाने दुकानदार, विक्रेते यांसोबतच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची एकच धांदल उडाली. नागरिकांजवळ छत्र्या नसल्याने पावसापासून बचाव म्हणून लगेच आजूबाजूच्या दुकानांचा आसरा नागरिकांनी घेतला.

वीजपुरवठा खंडित
ठाणे शहरात कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे नौपाडा, गोखले रोड, पाचपाखाडी भागातील वीजपुरवठा काही तासांसाठी खंडित झाला होता. तर, अनेक भागात दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांवर झाडे कोसळल्याने नुकसान झालेले दिसून आले. तर दिव्यासह आनंदनगर भागात काही ठिकाणी पाणी साचल्याचेदेखील दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

SCROLL FOR NEXT