मुंबई

३२ वर्षांपासून वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान

CD

वाडा, ता. १३ (बातमीदार) : वाढदिवस म्हटला की, अनेक जण एखादे हॉटेल अथवा रिसॉर्टकडे धाव घेतात. कुणी आपल्या कुटुंबासमवेत, मित्र मंडळींना सोबत घेऊन केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करतात. मात्र गेल्या ३२ वर्षांपासून एक व्यक्ती कुणालाही न सांगता दवाखान्यात धाव घेत रक्तदान करत आपला वाढदिवस साजरा करत आहे.

वाडा तालुक्यातील मौजे पीक येथील रामचंद्र विष्णू पाटील हे अंबरनाथ येथील नौसेना सामुग्री अनुसंधान या भारत सरकारच्या प्रयोगशाळेत टेक्निशियन या पदावर कार्यरत आहेत. ते गेली ३२ वर्षे सातत्याने वाढदिवशी रक्तदान करतात. रामचंद्र पाटील यांनी सोमवारी (ता. १३) दरवर्षीप्रमाणे कळवा हॉस्पिटलमध्ये जात रक्तदान करून ५७ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाव्यतिरिक्त त्यांनी गरजू रुग्णांसाठी अन्यवेळी २६ वेळा रक्तदान केले. म्हणजेच वयाच्या ५७ वर्षांत त्यांनी तब्बल ५८ वेळा रक्तदान केले.

गेली ३२ वर्षे सातत्याने आपल्या वाढदिवशी रक्तदान करत असल्याबाबतची पुसटशी कल्पना पाटील यांनी कुणालाच दिलेली नव्हती. वाढदिवसाच्या दिवशी कार्यालयात कामावर असताना मधल्या सुट्टीत गुपचूप रुग्णालयात जाऊन रक्तदान करत असे. वाढदिवशी सुट्टी असेल तर काहीतरी बहाणा करून घराबाहेर पडून रुग्णालयात जाऊन रक्तदान करत असे. गतवर्षी गुपचूप रक्तदान करण्याचे त्यांचे बिंग येथील डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देऊन फोडले. सातत्याने ५८ वेळा रक्तदान करणाऱ्या रामचंद्र पाटील यांचे अभिनंदन होत आहे. कुठल्याही केलेल्या दानाची वाच्यता केली तर त्या दानाची किंमत शून्य होते, असे सांगून रक्तदानाविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

Uddhav Thackeray: ५ ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी? दुष्काळावरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

Marathi News Live Updates : राज्यात 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

SCROLL FOR NEXT