मुंबई

पावसामुळे रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला

CD

पावसामुळे रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला  

मुंबई, ता. १३ : मुंबईत आज सायंकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सायंकाळी अनेक ठिकाणी वाहनांत झालेल्या बिघाडामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे शहर आणि उपनगरांत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
सायंकाळी चारच्या सुमारास अचानक वादळी पाऊस सुरू झाला. तसेच ढगाळ वातावरणामुळे अनेकांनी घरचा रस्ता धरला. एकाच वेळी अनेक गाड्या रस्त्यांवर आल्यामुळे विविध मार्गांवर रस्ते वाहतूक ठप्प झाली. पूर्व मुक्त मार्ग, पश्चिम द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच टेम्पोच्या बिघाडामुळे बी. ए. रोड भायखळा येथील उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ झाली. अपघातामुळे फ्री-वे बोगदा ट्रॉम्बे येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक आणि होर्डिंग पडल्यामुळे पूजा जंक्शन वडाळा येथे उत्तरेकडे जाणाऱ्या वाहतुकीला फटका बसला. होर्डिंग पडल्यामुळे कामराजनगर उत्तरेकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. 
...
विमानसेवा तासभर ठप्प 
मुंबईतील खराब हवामान आणि धुळीच्या वादळांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कमी दृश्यमानता आणि सोसाट्याचा वारा यामुळे सुमारे ६६ मिनिटांसाठी विमानसेवा स्थगित करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजता वाहतूक पूर्ववत करण्यात आली. यावेळी १५ विमाने वळविण्यात आली. विमानतळ प्रशासनाने गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व धावपट्टीची देखभाल यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्याचा उपयोग झाला, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT