मुंबई

अवकाळी पावसामुळे मेट्रो दोन तास ठप्प

CD

अवकाळी पावसामुळे मेट्रो दोन तास ठप्प

मुंबई, ता. १३ : अचानक आलेल्या पावसाचा आज घाटकोपर-वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रो वनला फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे उडून आलेला भलामोठा कपडा विमानतळ मेट्रो स्थानकातील ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने घराच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने झोपडपट्टी परिसरात घराच्या छतावर टाकलेला कपडा उडून स्थानकाच्या ओव्हरहेड वायरवर पडला. त्यामुळे ४.२५ वाजल्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक थांबवण्यात आली होती. मेट्रोच्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी तो कपडा काढल्यावर सायंकाळी ६.२० च्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली. याबाबत मेट्रो-वन प्रशासनाकडे विचारणा केली असता वाहतूक अवघ्या दहा मिनिटांत सुरू झाल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT