मुंबई

पावसामुळे वीज खंडित, मोबाईलच्या उजेडात मतदान

CD

पावसामुळे वीज खंडित, मोबाईलच्या उजेडात मतदान
पनवेल, ता. १३ (बातमीदार) : वादळी वाऱ्यासह पावसामुळे पनवेल तालुक्यातील जवळपास २० गावांतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. याचा फटका सोमवारी झालेल्या मतदानाला बसला. परिणामी जो मोबाईल मतदान केंद्रावर घेऊन जाण्यास मनाई होती त्याच केंद्रात मोबाईलच्या टॉर्चच्या साह्याने मतदान करण्याची वेळ मतदारांवर आली. तसेच अंधारात मतदान करण्यास अडथळा झाल्याने दोन ते अडीच तास मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले; तर अनेक मतदारांनी मतदान न करता घरी जाणे पसंत केले.
अचानक आलेल्या अवकाळी पावसात वीज गेल्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक एकमधील धानसर गावात मोबाईलच्या उजेडात मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेदरम्यान दुपारच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. या वेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लहान-मोठे वृक्ष कोसळण्याची शक्यता लक्षात घेत महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी, ग्रामीण भागात असणाऱ्या मतदान केंद्रांत अंधार पडून मतदान प्रक्रिया काही काळ विस्कळित झाली होती. काही काळानंतर ग्रामस्थांनी आणलेल्या चार्जिंगच्या बॅटऱ्या आणि मोबाईल टॉर्चच्या उजेडात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला संपवलं; नंतर मृतदेहाची जंगलात विल्हेवाट, ठाण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला अटक, १२ वर्षांनी गूढ उलगडलं

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT