मुंबई

उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : नियमांचे उल्लंघन करत पुण्यात रक्त संकलन केंद्राला परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत उच्च न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली आहे.
सोलापूर येथील मोरया मेडिकल रिलीफ अँड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला पुणे येथे नवीन रक्तसंकलन केंद्र उभारायचे असून तसा अर्ज त्यांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे केला होता, मात्र या ठिकाणी नवीन रक्तपेढीची गरज नसल्याचे सांगत त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करत दुसऱ्या रक्तसंकलन केंद्राला परवानगी देण्यात आली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात मोरया मेडिकल रिलीफ अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ॲड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. जितेंद्र जैन यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याचिकेची दखल घेत राज्य सरकारला नोटीस बजावत सुनावणी १० जून रोजी ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'पिक्सिस पायोनियर' जहाज LPG घेऊन मंगळूर बंदरात दाखल

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT