मुंबई

मोदींच्या दूरदृष्‍टीमुळेच भारताची प्रगती

CD

मुंबई, ता. १३ ः गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने सर्व पातळ्यांवर प्रगती केली आहे. त्यामुळे देशहितासाठी जनता नरेंद्र मोदी यांना, तसेच भारतीय जनता पक्षाला पाठबळ देईल, अशी खात्री परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज येथे व्यक्त केली. चीनने आपला कोणताही भूभाग आता बळकावला नाही, असेही ते म्हणाले.
बीकेसीच्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज संकुलात ते पत्रकारांशी बोलत होते. आज देशात रोज २८ किलोमीटर हायवे बांधले जात असून १४ किलोमीटरचे रेल्वे मार्गही उभारले जात आहेत. दर दोन वर्षांत एका शहरात मेट्रो येत असून दरवर्षी सात-आठ विमानतळांची भर देशात पडते आहे. हे मोदी यांचे विकासाचे व्हिजन आहे, त्या तुलनेत जुने परमिट राज आणि उच्च पातळीवरचे कर हे दुःखद चित्र होते. आज अतिरेकीमुक्त देश हे नरेंद्र मोदी यांचे आश्वासन आहे, पण दहा वर्षांपूर्वी सत्ताधारी पक्ष अतिरेकी हल्ल्यांचा इलाजच नाही, हल्ले तर होणारच असे म्हणत होते. कसाब हल्ल्यानंतर प्रतिहल्ल्याची किंमत जास्त असेल म्हणून प्रतिहल्ला न करण्याचा निर्णय झाला. मोदी यांच्या ठाम नेतृत्वाखाली उरी, बालाकोट प्रतिहल्ले करण्यात आले, असेही जयशंकर यांनी दाखवून दिले.

२०१४ पूर्वी टूजी, थ्रीजी, फोरजी या सेवा चीनच्या होत्या. आज आपण फाईव्ह-जी तंत्रज्ञानदेखील स्वदेशी आणले आहे. पंधरा वर्षांपूर्वी इंटेल कंपनीला भारतात यायचे होते, पण त्यांचे कोणीही स्वागत न केल्यामुळे ते चीनमध्ये गेले. रघुराम राजन तसेच राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, आपण उत्पादन करू शकत नाही. आता देशात सरकारी आणि खाजगी गुंतवणूक होत असून चार जूननंतर परदेशी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर येईल. जुन्या चुकांमुळे आपण प्रगती केली नाही, त्यामुळे उत्पादन वाढ कठीण झाली. बँका धड नसल्यामुळे कर्जे मिळत नव्हती, त्यामुळे दळणवळण आणि प्रवासही महाग झाला. त्यामुळे पंधरा वर्षांपूर्वी उत्पादनात अडचणी येत होत्या, मात्र आता चित्र बदलले असल्याचेही जयशंकर म्हणाले.

नेहरू यांच्या चुका
मोदींच्या राज्यात आपला कोणताही भूभाग चीनने बळकवला नाही. उलट १९५८ आणि १९६२ मध्ये चीनने भारताचा पेगाँग सो, लदाक ब्रिज हा भूभाग बळकावला आहे. शक्सगाम व्हॅली ही नेहरूंमुळेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेली व तोच भाग त्यांनी चीनला देऊन टाकला. अरुणाचलच्या यांगत्से मधून आम्हीच चीनची हकालपट्टी केली. तरीही हमारे जवानों की पिटाई हुई, असे राहुल गांधी खोटे बोलतात, असेही जयशंकर यांनी दाखवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT