मुंबई

‘एलन’चा माजी विद्यार्थी मेळावा उत्‍साहात

CD

‘एलन’चा माजी विद्यार्थी मेळावा उत्‍साहात
कोटा, ता. १३ : एलन करिअर इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला. देशातील सुमारे एक हजार डॉक्टर कोटा शहरात दाखल झाले होते. वेगवेगळ्या वर्षी एलन इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले माजी विद्यार्थी या दोन दिवसीय ‘एलन एल्युमिनाई मीट’मध्ये सहभागी झाले होते.
सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, एलन परिवाराच्या मातोश्री कृष्णादेवी मानधना, संचालक डॉ. गोविंद माहेश्वरी, राजेश माहेश्वरी, नवीन माहेश्वरी, डॉ. बृजेश माहेश्वरी, विभागप्रमुख के. जी. वैष्णव, पी. बी. सक्सेना उपस्थित होते. यावेळी ‘एलन’च्या विद्यार्थ्यांना ‘एलन परिवार स्कॉलरशीप’ची घोषणा करण्यात आली.
बिर्ला म्हणाले, ‘‘कोटाचे प्रतिनिधित्व करत असल्याचा मला अभिमान आहे. कारण जगभरात फिरत असताना कोटामधून शिक्षण घेणारे विद्यार्थी भेटतात. शिक्षणासाठी कोटा शहर उत्तम असून, येथील शिक्षणाची पद्धत आणि सुविधा उत्कृष्ट आहे. म्हणूनच येथे दरवर्षी लाखो विद्यार्थी शिकायला येता. एलन इन्स्टिट्यूटचे यात विशेष योगदान आहे,’’ असे त्‍यांनी सांगितले.
‘संस्कार से सफलता तक’ हे ध्येयवाक्य घेऊन आम्ही कार्यरत असल्याचे डॉ. गोविंद माहेश्वरी यांनी सांगितले. ‘‘शिक्षणाबरोबरच संस्कार देणे ही आमची प्राथमिकता आहे. म्हणूनच आज एलन इन्स्टिट्यूट एक परिवार म्हणून उदयास आली आहे,’’ असेही ते म्हणाले. माजी विद्यार्थ्यांना बदललेले कोटा शहर दाखविण्यासाठी एलनचा प्रयत्न असल्याचे राजेश माहेश्वरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

SCROLL FOR NEXT