मुंबई

शिक्षक-पदवीधर निवडणूक पुढे ढकला!

CD

शिक्षक-पदवीधर निवडणूक पुढे ढकला!
शिक्षक भारतीची उच्च न्यायालयात याचिका; आज पुन्हा सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : निवडणूक आयोगाने शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १० जून रोजी जाहीर केली आहे; परंतु मे महिन्याच्या सुट्टीत बाहेर गेलेले शिक्षक व कर्मचारी या मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे हे मतदान जून महिन्याच्या शेवटी घेण्यात यावे, अशी मागणी करत शिक्षक भारतीच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने याचिकेची दखल घेत मंगळवारी (ता. १४) पुन्हा सुनावणी ठेवली आहे.
शिक्षण विभागाने २ मे ते १४ जूनपर्यंत सुट्टी जाहीर केली असून शाळा १५ जूननंतर सुरू होणार आहेत. तसेच १७ जून ते २० जूनपर्यंत बकरी ईदनिमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी आहे. मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदारसंघातील उत्तर भारतीय शिक्षक ११ जून रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टीमुळे मुंबईबाहेर गेले आहेत. याचा विचार करता निवडणूक आयोगाने शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी करत शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांनी ॲड. सचिन पुंडे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

आज अंतिम निर्णय
सुट्टीकालीन न्यायालयाचे न्या. संदीप मारणे व न्या. नीला गोखले यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वकिलांनी शिक्षक भारतीच्या मागणीचा विचार करून उद्या अंतिम निर्णय घेऊ, असे खंडपीठाला सांगितले. न्यायालयाने याची दखल घेत सुनावणी मंगळवारी ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT