मुंबई

वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्यास अटक

CD

भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : शहरातील एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या बांगड्या हातचलाखीने लंपास करणाऱ्याला शांतीनगर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. मोहमद इम्रान मोहमद अमीन अन्सारी (४०) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. रावजीनगर येथील हिना अपार्टमेंटमधील सरफुनिसा मो. समी. चौधरी (८५) ही वृद्ध महिला ३० एप्रिल रोजी नमाज पठण करून येत असताना त्यांना मोहमद इम्रान याने गाठले. माझ्या शेठला मुलगा झाल्याने तो मोहल्ल्यात पैसे वाटत असल्याचे सांगून त्यांच्या हातातील तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या रूमालात ठेवण्यास सांगितले. त्यांनी बांगड्या रूमालात बांधताच त्या हातचलाखीने चोरून मोहमदने मूळ गावी पलायन केले.
या फसवणूकप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अतुल अडुरकर, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश घुगे, पोलिस हवालदार संतोष पवार, पोलिस नाईक किरण जाधव, श्रीकांत पाटील, पोलिस शिपाई नरसिंह क्षीरसागर, रवींद्र पाटील, रोशन जाधव, तौफिक शिकलगार, विजय ताटे यांच्या पोलिस पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. तसेच सीसीटीव्हीच्या आधारे गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता त्याचे नाव मोहमद इम्मान अंसारी असून तो छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर पोलिस पथकाने छत्रपती संभाजीनगरमधून त्याला अटक केली. तसेच गुन्ह्यातील एक लाख १५ हजार किमतीच्या तीन सोन्याच्या बांगड्या जप्त केल्या. पुढील तपास शांतीनगर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT