मुंबई

घाटकोपर दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखांपर्यंत अर्थसाह्य

CD

घाटकोपर दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखांपर्यंत अर्थसाह्य
मंगलप्रभात लोढा यांची घोषणा, जखमींचा उपचाराचा खर्च सरकार करणार

मुंबई, ता. १४ : वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना अडीच लाख रुपयांपर्यंत अर्थसाह्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज (ता. १४) येथे केली.
पालकमंत्री लोढा यांनी राजावाडी हॉस्पिटलमधील जखमींची भेट घेतल्यानंतर त्यांनी मदतीची घोषणा केली. सध्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये एक जखमी आयसीयूमध्ये असून इतरांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून जखमींना आर्थिक नुकसानभरपाई देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ६० टक्क्यांपेक्षा कमी व्यंग आलेल्या व्यक्तींना ७५ हजार रुपये; तसेच ६० टक्क्यांपेक्षा जास्त व्यंग आलेल्यांना अडीच लाख रुपये तसेच किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये देण्यात येतील, असेही लोढा यांनी सांगितले.

हे होर्डिंग पेट्रोल पंपाजवळ अनधिकृतरीत्या उभारण्यात आले होते. महापालिकेने नोटीस बजावूनसुद्धा होर्डिंग हटवण्यात आले नाही. त्याचे सेफ्टी ऑडिट किंवा तत्सम प्रक्रियासुद्धा झाल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्टपणे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे, पालकमंत्र्यांची दिल्लीवारी; भाजपचं नाव ठरलं पण

Beed News: इंधन दरवाढ, नीट पेपरफुटी विरोधात बीडमध्ये एल्गार पँथर सेना आणि आंबेडकर विकास मंच आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT