मुंबई

उन्मळून पडलेली झाडे उचलण्याचे आव्हान

CD

उन्मळून पडलेली झाडे उचलण्याचे आव्हान
४०० टन वाढला अतिरिक्त कचरा
ठाणे शहर, ता. १४ (बातमीदार) : अवकाळी पावसामुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात झाडे आणि झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र झाडे, झाडांच्या फांद्या आणि पालापाचोळा दिसत होता. हा कचरा उचलण्याचे मोठे आव्हान ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांपुढे आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे रोजच्या कचऱ्यात सुमारे ४०० टन अतिरिक्त कचरा वाढला होता. रोजचा कचरा आणि वाढलेला कचरा असा दुहेरी भार सफाई कर्मचाऱ्यांवर पडला. त्यामुळे सकाळपासून दिवसभर सर्वत्र सफाई कर्मचाऱ्यांची जोमात सफाई सुरू होती.

सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाने मुंबईसह ठाणे शहराला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ठाण्यात घरांच्या पडझडीबरोबर मोठे डेरेदार वृक्ष जमीनदोस्त झाले. त्यामुळे रस्तेही जाम झाले होते. ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन केंद्राने युद्धपातळीवर पडलेली झाडे कापून रस्ता मोकळा केला आहे; मात्र आता खरी कसोटी सफाई कर्मचाऱ्यांची आहे. झाडांच्या फांद्या रस्त्याच्या बाजूला करताना फांद्या आणि पालापाचोळा उचलताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. शहरातील रस्ते आणि गल्लीबोळ अशा कचऱ्यांनी भरलेले होते. त्यातच गल्लीबोळात असलेले समाजकंटक कर्मचाऱ्यांना कचरा उचलण्यासाठी दमदाटी करताना दिसले. आमच्या परिसरातील कचरा आधी उचल, अशी दमदाटी हे कथित समाजसेवक करत होते. कर्मचारी मात्र गुमानपणे सफाई करताना दिसून आले. आता पुढील काही दिवस हाच भार सफाई कर्मचाऱ्यांना पेलावा लागणार आहे. शहरात पसरलेला पालापाचोळा उचलून पुन्हा शहर स्वच्छ करावे लागणार आहे.

पावसामुळे कोसळलेले वृक्ष पूर्णपणे कापून त्याचे ओंडके करण्याचे काम महापालिकेच्या उद्यान विभागाचे आहे; मात्र हा विभाग फारसा गंभीर नसतो. ओंडके करणारा ठेकेदार जेव्हा येईल, त्यावेळी रस्त्यावरील झाडे उचलली जातील; मात्र पालापाचोळा, छोट्या फांद्या सफाई कर्मचारी उचलत आहेत. यासंदर्भात पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश दिला जात असला, तरी झाडांच्या संवर्धनाबाबत पालिका प्रशासन बेफिकीर असल्याचे जाणवते. कारण वेळीच झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी होत नाही. पालिकेचे वृक्ष अधिकारी, कर्मचारी कुठे काम करतात हेदेखील समजून येत नाही. याचा विपरीत परिणाम झाडांवर होतो आहे. सोमवारी झालेल्या वादळी पावसात सफाई कर्मचाऱ्यांची झाडांचा कचरा उचलण्यासाठी दमछाक झाली होती.
- विजय त्रिपाठी, दक्ष नागरिक, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT