मुंबई

जीव वाचला, पण ‘रोजीरोटी’चा चुराडा

CD

घाटकोपर, ता. १४ : दिवा येथे राहणारे सुभेदार मौर्य (वय ६२) हे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. यात ते थोडक्यात बचावले असले तरी रोजीरोटी देणाऱ्या टॅक्सीचा त्यांच्या डोळ्यादेखत चुराडा झाला आहे. उदरनिर्वाहाचे साधनच हिरावले गेल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

दिवा येथील सद्‌गुरूनगर येथे ते राहतात. ते टॅक्सीचालक असून मुलुंड येथे त्यांचा टॅक्सी स्टँड आहे. सीएनजी भरण्यासाठी चेंबूर, तर कधी घाटकोपर पूर्वेतील पेट्रोलपंपावर ते जात असत. सोमवारी ते दुपारी वेळेस घाटकोपर येथील पेट्रोलपंपावर गेले होते. रांग असल्याने ते टॅक्सीबाहेर उभे होते. त्यादरम्यान अचानक होर्डिंग कोसळले आणि मोठमोठ्या किंकाळ्या त्यांच्या कानावर पडल्या. ते थोडक्यात यातून बचावले, मात्र त्यांच्या डोक्याला आणि पाठीला होर्डिंगचा काही भाग घासल्याने ते जखमी झाले, असे त्यांचे लहान भाऊ जितेंद्र मौर्य यांनी सांगितले.
सुभेदार यांना तीन मुले असून दोघांचे लग्न झाले आहे. एक मुलगा गतिमंद असून घरची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. टॅक्सी चालवून ते कुटुंबाचा गाडा चालवत होते. हे साधनच हिरावले गेल्याने कुटुंबाची चिंता त्यांना सतावत असल्याचे जितेंद्र मौर्य यांनी सांगितले.

फोटो : घाटकोपर येथील पेट्रोलपंपावर होर्डिंग कोसळून जखमी असलेले सुभेदार मौर्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT