मुंबई

दिल्लीतील इंजिन बदलायचे आहे

CD

दिल्लीतील इंजिन बदलायचे आहे
उद्धव ठाकरेंचा घणाघात, वसईतील सभेत मोदी-शहांना आव्हान
वसई, ता. १४ (बातमीदार) : इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आणणारच असल्याचे ठणकावून सांगत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. मोदी-शहा पक्षांतर करायला लावत असून पक्षात या; नाही तर जेलमध्ये जा, असे राजकारण सुरू आहे. त्यामुळे या सरकारच्या इंजिनला डब्यावर डबे लागत आहेत; मात्र आता दिल्लीतील इंजिन बदलायचे असल्याचा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. वसईतील माणिकपूर मैदानावर आज (ता. १४) इंडिया आघाडीच्या झालेल्या सभेत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
गेल्या १० वर्षांत कोणी कोणाच्या पाठीत वार केला ते जगाने पाहिले आहे. नरेंद्र मोदी काही चांगले करतील, असे वाटले होते; मात्र त्यांनी मतदारांना फक्त भूलथापा दिल्या असल्याची टीका त्यांनी केली. या वेळी त्यांनी थेट अमित शहांना एकाच व्यासपीठावर या. मी चर्चेला तयार असल्याचे सांगत आव्हान दिले. मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी मी मते मागण्याचे पाप केले; मात्र त्याची आज मला लाज वाटते, अशा शब्दातही ठाकरेंनी भाजपवर आगपाखड केली.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, हे अमित शहा म्हणतात, उद्धव ठाकरे राम मंदिरात आले नाहीत. तुम्ही सांगणार त्या मुहूर्तावर मी यायचे का? मी मुख्यमंत्री होण्याआगोदर आणि नंतरदेखील रामलल्लाचे दर्शन घेतले आहे, असे सांगत मी तुमची पालखी उचलणारा अंधभक्त नाही, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. या वेळी त्यांनी इंडिया आघाडीचे सरकार आले, तर मोदी-शहांनी जे उद्योग गुजरातला नेले होते, ते पुन्हा महाराष्ट्रात आणू व जीएसटीही रद्द करू, असे अश्वासनही या वेळी त्यांनी दिले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्रात लाट येणार असून गृहमंत्री खोटे बोलतात, अशा शब्दात माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी महायुतीवर टीका केली. पालघर जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांनी या वेळी, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना पालघरला मोठा निधी दिल्याचे सांगितले.

--------
वसई : वसई पश्चिम माणिकपूर मैदानावर इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत झालेली गर्दी
व बोलताना उद्धव ठाकरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT