मुंबई

आमचे पालक भविष्यासाठी नक्की मतदान करणार

CD

अंबरनाथ, ता. १५ (बातमीदार) : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अंबरनाथमध्ये शिकवणीला येणाऱ्या लहान मुलांमध्ये जागृती करण्यात आली. ‘आमचे पालक आमचे हिरो’, ‘आमच्या भवितव्यासाठी करणार ते मतदान’ असे सांगून शिक्षिकेने विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण केली.
अंबरनाथच्या पूर्वेकडील भागात मोहन पूरम परिसरात शहरातील इनरव्हिल, गुरुकुल ग्रँड युनियन स्कूल, ग्लोबल स्कूल, पोदार, आर्या गुरुकुल गुरुनानक आदी विविध शाळांतील विद्यार्थी शेफाली नाडकर यांच्याकडे शिकवणीसाठी येतात. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मतदान करावे, या हेतूने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, त्यांनी मतदान का करावे, प्रत्येकाने मतदान केल्यानंतर प्रगती होण्यास हातभार लागतो, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली. या वेळी विद्यार्थ्यांनी आमच्या भविष्यासाठी पालक नक्कीच मतदान करणार, अशी शपथ घेतली. सध्या पाणी टंचाईचे महत्त्व ओळखून नाडकर यांनी पाणी बचतीचे महत्त्व आणि प्लास्टिकचा वापर टाळा याबाबत जनजागृती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Health: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरणावर भर; NCD मॉडेलमध्ये डिजिटल ट्रॅकिंगचाही समावेश

SCROLL FOR NEXT