मुंबई

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोई-सुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ८५ पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर सोई-सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेऊन जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी दिव्यांग मतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिव्यांग मतदार मुंबई उपनगर
पुरुष - ९,३६४
महिला - ६,७५०
दिव्यांग तृतीयपंथी - ०२
एकूण - १६,११६
...
मतदान केंद्रावर - १,१०६ व्हिलचेअर
- ६१३ ठिकाणाहून वाहतूक व्यवस्था
- १,१०६ स्वयंसेवकांची नियुक्ती
- १,३२१ मतदारांचे ब्रेल व्‍होटर स्लिप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT